हातातून गेलेला सामना रोहित शर्माने लगावलेल्या दोन षटकारांमुळे जिंकता आला... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, January 29, 2020

हातातून गेलेला सामना रोहित शर्माने लगावलेल्या दोन षटकारांमुळे जिंकता आला...



मुंबई/प्रतिनिधी
         मुंबईकर रोहित शर्माच्या तडाखेबाज दोन सिक्सरच्या जोरावर टीम इंडियाने न्यझीलंडचा विजय हिरावून घेतला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला विजय-पराभवाचा थरार रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीने गाजवला आणि न्यूझीलंडविरूद्धची पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका टीम इंडियाने ३-०ने खिशात घातली आहे. पाहूयात सुपर ओव्हरचा थरार…
        सुपर ओव्हर टाकण्यासाठी भारताकडून जसप्रीत बुमराह आला होता. तर न्यूझीलंडकडून फलंदाजीसाठी विल्यम्सन आणि गप्टिल हे अनुभवी फलंदाज आले होते.
        
पहिल्या चेंडूर एक धावदुसऱ्या चेंडूवर अवघी एक धाव. पहिल्या दोन चेंडूत न्यूझीलंडला फक्त दोन धावा करता आल्यातिसऱ्या चेंडूवर विल्यम्सने लगावला षटकार. न्यूझीलंडच्या आठ धावाचौथ्या चेंडूवर विल्यम्सनने लगावला चौकार. न्यूझीलंडच्या बारा धावापाचव्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. न्यूझीलंडच्या १३ धावाअखेरच्या चेंडूनर विल्यम्सनने लगावला चौकार, न्यूझीलंडच्या १७ धावा
            न्यूझीलंडकडून गोलंदाजीसाठी टीम साऊदी आला होता. फलंदाजासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि राहुल आले. भारताला विजयासाठी १८ धावांची गरज.
            पहिल्या चेंडूवर भारताने दोन धावा घेतल्या.दुसऱ्या चेंडूवर फक्त एक धाव. भारताच्या तीन धावा. दोन चेंडूवर रोहित शर्माला फक्त तीन धावा करता आल्या.तिसऱ्या चेंडूवर राहुलने लगावला चौकार. भारताच्या सात धावा. विजयासाठी तीन चेंडूत ११ धावांची गरजचौथ्या चेंडूवर राहुलने एक धाव काढली. भारताच्या ८ धावा. विजयासाठी दोन चेंडूत दहा धावांची गरजपाचव्या चेंडूवर रोहित शर्मानं लगावला खणखणीत षठकार. भारताच्या १४ धावा. विजयासाठी एका चेंडूत चार धावांची गरजअखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना रोहित शर्माने लगावला षटकार. भारताच्या २० धावा.


Pages