मंगळवेढा-जत रोडवर खड्डयांचे साम्राज्य जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, November 9, 2019

मंगळवेढा-जत रोडवर खड्डयांचे साम्राज्य जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास....


मंगळवेढा पाठकळमार्गे जतरोडवर ताडवस्तीनजिक रस्त्याच्या मधोमध पडलेला हा भलामोठा जीवघेणा खड्डा....


मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा पाटकळ मार्गे जत रोडवर मोठ-मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे. मंगळवेढा पाटकळ मार्गे जत रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते त्याचबरोबर या मार्गावर मंगळवेढा परीवहन महामंडळाच्या मंगळवेढा-जत,मंगळवेढा-मानेवाडी,मंगळवेढा-पडोळकरवाडी, मंगळवेढा-भोसे मंगळवेढा-नंदेश्वर या बसेस धावत असतात. त्याचबरोबर जत डेपोच्या व सोलापूर परिवहन महामंडळाच्या जत-मंगळवेढा,जत-पंढरपूर,उस्मानाबाद-मंगळवेढा-सोलापूर या बसेस धावत असतात.त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये असल्यामुळे खासगी बसेसची या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
प्रामुख्याने मंगळवेढा-पाठकळ खडकी नंदेश्वर भोसे हुन्नुरमार्गे जत या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न येथील वाटसरूनां पडलेला आहे.
         या खड्ड्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या दुचाकीला अपघात झाला असून त्याचबरोबर चार चाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे मंगळवेढा-पाठकळ-भोसेमार्गे जतरोडवरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करून रस्ता चांगला बनवावा अन्यथा शालेय विद्यार्थी वाहनचालक-मालक संघटना यांच्यासह मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा येथील नागरीकांना दिलेला आहे.
         "मंगळवेढा पाठकळ मार्गे जत रोडवर मोठमोठे खड्डे पडले असुन या खड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची
संख्या वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आम्ही शालेय विद्यार्थी वाहन चालक-मालक प्रवासी व नागरिकांसहीत मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपाचे आंदोलन करू :- पाटखळचे उपसंरपच दादा  ताड

Pages