छातीत दुखू लागल्याने शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, November 11, 2019

छातीत दुखू लागल्याने शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल....मुंबई/प्रतिनिधी

       गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
       गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या अशात आता सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अवघे काही तास उरलेले असताना संजय राऊत यांना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.

Pages