शासनाकडून जलद गतीने मदत देण्यास भाग पाडू: आ.भारत भालके - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, November 6, 2019

शासनाकडून जलद गतीने मदत देण्यास भाग पाडू: आ.भारत भालके


आ.भारत भालके यांचा मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा पाहणी दौरा...


मंगळवेढा/प्रतिनिधी

            मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाला झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत दोन दिवसात या भागातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची पंचनामे पूर्ण करा शासनाला जलदगतीने मदत देण्यास भाग पाडू असे मत आ.भारत भालके यांनी  पिकांच्या पाहणीच्या वेळी शेतकर्‍यांसमोर व्यक्त केले.
                    मंगळवार दि 5 रोजी मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी ,माचणुर,मरवडे,भालेवाडी,रड्डे,भोसे,रेवेवाडी,नंदेश्वर या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीचा दौरा आ भालके यानी केला यावेळी प्रांताधिकारी उदय भोसले , तहसीलदार  स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी,तलाठी उपस्थित होते
              राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली  शेतातील पिकांचे फार मोठे  नुकसान झालेआहे  मंगळवेढा तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांनी कांदा, झेंडू ,ऊस, द्राक्षे डाळिंब, सूर्यफूल, मका आदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या कसोशीने प्रयत्न करत बागा जगवल्या होत्या मात्र अवकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत अशातच राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याबाबत सरकारच्या गतिमान हालचाली नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करून त्वरित अहवाल पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कार्यवाहीला गती येत नसल्याचे दिसून येत असताना तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ बाधित पिकांचे पंचनामे करून घेण्यासंदर्भात आ भालके  अनेक गावांना भेटी देत पिकांची पाहणी करीत प्रांताधिकारी,  तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याच्या  सुचना दिल्या
          अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या समोर शेतकऱयांनी गहिवरून आपल्या आर्थिक नुकसानीची कैफियत सांगत गट वर्षी पाऊस नसल्याने तर यावर्षी जादा पावसामुळे नुकसान झाले त्यामुळे सोसायचे तरी कसे असा सवाल करीत शासनाने नुकसणीपोटी भरीव मदत देऊन सम्पूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली जात आहे

चौकट
            ब्रह्मपुरी येथील सुनील प्रताप पाटील यांच्या शेतातील दोन एकर शेवंती, चार एकर झेंडू,दोन एकर द्राक्षे पिकांचे नुकसान झाले आहे तसेच सिद्धेश्वर भिवा कोकरे यांचा ऊसाचे नुकसान झाले आहे, माचनूर येथील महादेव श्रीमंत डोके यांच्या शेतातील कांद्याचे, भालेवाडी येथील दुर्योधन नाना गवळी, ,तळसंगी येथील अरुण दत्तात्रय गवळी यांच्या शेतातील कांदा चे नुकसान झाले आहे. तसेच रड्डे येथील कांत पुजारी यांची चार एकर मका,शिलेदार यांची ज्वारी पाणी लागून खराब झाली आहे , रेवेवाडी येथील ब्रम्हदेव रेवे यांनी कापून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे,आणि बाळासाहेब काकडे यांचा कांदा पावसामुळे  पुर्ण खराब झालेला आहे , नंदेश्वर येथील भारत सुखदेव गंरडे यांच्या द्राक्षे बागेचे पावसामुळे नुकसान झाले आहे यासह अनेक शेतकऱयांचे न सांगण्यासारखे नुकसान झाले आहे

Pages