माचनूरच्या सुनील पाटील यांनी भिमा नदीत बुडणाऱ्या सहा तरुणांचे प्राण वाचवले - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 5, 2019

माचनूरच्या सुनील पाटील यांनी भिमा नदीत बुडणाऱ्या सहा तरुणांचे प्राण वाचवले


मंगळवेढा/प्रतिनिधी

        माचणूर ता.मंगळवेढा येथील भिमा नदीच्या पात्रात बुडणाऱ्या 6 जणांना  माचणूर चे माजी सरपंच सुनिल उर्फ(पप्पू)पाटील यांनी स्वता आजारी असूनसुद्धा जीवाची पर्वा न करता  पुराच्या पाण्यातून स्वता पोहत  जाऊन त्यांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले असून
, याबाबत अधिक माहिती अशी की लातूर येथील काही तरुण बेगमपूर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त आले होते पंरतु दि 4 रोजी ते फिरत माचनूर येथील बंधाऱ्या नजीक आले होते  त्यावेळी त्यांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बंधाऱ्याच्या खालील बाजूस 6जण पोहण्यास उतरले दरम्यान  भीमा नदीला उजणीतून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीला पाणी मोठया प्रमाणात वहात आहे होते पंरतु त्या तरुणांनी अशा स्थितीत पोहण्यास गेले असता या ठिकाणी नदीला वक्राकार असल्याने या ठिकाणी पाणी वेगाने वहात असते परन्तु तरुणांना याचा अंदाज न आल्याने  ते सहाही तरुण येथील पाण्याच्या धारेत बुडू लागले दरम्यान काळात या ठिकाणी माचनूर येथील माजी सरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील येथे मासे पाहण्यासाठी आले असता ते सहा तरुण आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा असा आरोळ्या मारत असल्याचे ऐकू येऊ लागल्याने पाटील यांनी त्या दिशेने धावत गेले क्षणाचाही विलंब न लावता कपडे काढून त्यांनी त्या सहा तरुणांना वाचवण्याच्या जिद्दीने पाण्यात उडी मारली मुळात पाटील हे गेल्या चार दिवसांपासून आजारी होते तरीसुद्धा त्यांनी बुडणाऱ्या तरूणांना वाचविण्याच्या उद्देशाने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाण्यात झोकून देत एकेकाला बाहेर काढण्यासाठी जीवाचा आकांताने प्रयत्न केले सुरवातीला त्यांना काही जणांची डोकी वर दिसली त्यातील एकाची केवळ तीन बोटेच वर दिसल्याने त्यास प्रथम बाहेर काढले त्यानंतर बाकीच्यांना बाहेर काढले पाचव्या व सहाव्या तरुणाला बाहेर काढताना आपण बाहेर येतो की नाही याची खात्री नसतानाही त्यांनी त्याच परिस्थितीत त्यांना बाहेर काढले या घटनेच्या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली परन्तु एकानेही नदीत उडी टाकून त्या तरुणांना वाचविण्याचे धाडस केले नाही पंरतु पाटील हे स्वतः आजारी असताना त्यांनी दाखविलेले धाडस  कौतुकास्पद आहे  या अगोदर ही त्यांनी अनेक जणांचे नदीत बुडताना प्राण वाचविले आहेत  त्यांच्या या धाडसी  वृत्तीमुळे सहा जणांचं कुटुंबावर कोसळणारा आघात वाचवून माणुसकीचे दर्शन  घडविले आहे हे तरुण लातूर येथील असून ते बेगमपूर येथे नातेवाईकांकडे आले होते त्यांची नावे समजू शकली नाहीत

कोट  -गेल्या दहा वर्षात भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून मी सहज नदीला गेलो असता बुडणाऱ्या तरुणांचा वाचवण्यासाठी आवाज आल्याचे ऐकताच आपण केवळ त्यांना वाचवण्याच्या उद्देशाने आजारी असताना ही पोहत जाऊन त्यांना बाहेर काढले  मी केवळ माणूसकीच्या बांधीलकीतुन हे काम केले आहे 
सुनील पाटील, माचनूर

Pages