शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 21, 2019

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट


मुंबई/प्रतिनिधी
          शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र अद्यापही सुरु आहे  शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र अद्यापही सुरु आहे. नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट केलं.
       विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात असल्याचं स्पष्ट केलं असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावं अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. बैठकीत ५०-५० फॉर्म्युलावर चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Pages