चंद्रकांत घुले , च॔की खवतोडे यांची स्वगृही भालके गटात घरवापसी...... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, October 19, 2019

चंद्रकांत घुले , च॔की खवतोडे यांची स्वगृही भालके गटात घरवापसी......


 परिचारक व आवताडे गटाला धक्का...

मंगळवेढा/प्रतिनिधी

      मंगळवेढा पंढरपूर मतदार संघात सुधाकरपंत परिचारक यांना निवडून आणण्यासाठी परिचारक कुटुंबीय जंगजंग पछाडत असले तरी निवडणुकीचा कल  त्यांच्या लक्षात आल्याने बहुजन समाजात फूट पडावी मतांचे विभाजन होऊन आ भारत भालके यांना धोका पोहचावा यासाठी परिचारक व आवताडे यांनी आर्थिक बळाच्या जोरावर भालके समर्थक फोडण्याचा सपाटा लावला असला तरी सर्वसामान्य जनता मात्र परिचारक व आवताडे याचा कावेबाज पणा आळखून आहेत
             दि.18 रोजी त्रयस्थ व्यक्तीच्या मध्यस्थीने  आवताडे गटात उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , नगरसेवक चंकी खवतोडे यांनी काल प्रवेश केल्यानंतर मंगळवेढ्यात प्रचंड खळबळ उडवून देण्याचा केलेला प्रयत्न पाच तासातच विरोधकांच्या अंगलट आला आहे   त्या दोघांच्या प्रवेशाची बातमी पसरल्यानंतर मंगळवेढा शहरातील बहुजन व मागासवर्गिय समाजातील जाणते नेते व शेकडो युवकांनी रात्री उशिरा  या दोन्ही नगरसेवकांचे घर गाठले
         सर्वांनी एकत्र येत भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची शिकार व्हायचे का ? बहुजन समाजात फूट फाडून परिचारकांचा फायदा करुन द्यायचा का ? लोकसभेला जशी बहुजनात फूट पाडून भाजपाने सोलापूरची जागा पदरात पाडून घेतली त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा करायची आहे का ? अशा प्रश्नांची सरबत्तीच युवकांनी केली. मराठा , धनगर , माळी , मुस्लिम , मागासवर्गीय समाजातील मतदार आपल्या बाजूला वळत नाहीत हे परिचारक गटाच्या लक्षात आले आहे.
 हे लोक आपल्याकडे येत नाहीत त्यामुळे त्यांनी आपल्याकडे न येणारा वर्ग संपूर्ण भालके यांच्याकडे जाऊ नये यासाठी वेगळ्या वाटेकडे ढकलण्याचे नियोजन केले. मंगळवेढ्यातील एका त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून या दोन्ही नगरसेवकांना आवताडे यांच्याकडे ढकलण्यात यश मिळविले.
    मात्र मंगळवेढ्यातील सर्व बहुजन युवकांनी एकत्र येऊन आपण सगळे एकाच वाटेने गेलो तरच यशस्वी होऊ *अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही याची जाणीव करुन दिली. त्यानंतर सर्वांची एकत्र बैठक होऊन आपला रस्ता एकच असून महाराष्ट्रात पवार साहेब आणि मंगळवेढ्यात ओन्ली भारतनाना म्हणत
 रात्री 1 वाजता सर्वांनी पुन्हा सरकोली येथील आ. भारतनाना यांची भेट घेऊन पुन्हा  म्हणत पवार साहेब व भारतनाना यांच्यासोबतच ताकदीनिशी सकाळपासूनच कामाला लागत असल्याची ग्वाही दिली.
 घुले , खवतोडे यांनी वेळेतच घेतलेल्या या निर्णयामुळे मंगळवेढा तालुक्यात उत्साह संचारला असून चुकीच्या रस्त्याने गेलेले अनेकजण या दोन दिवसात भारतनांनाच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
      सर्वसामान्य जनतेने ही निवडणुक हातात घेतल्याने परिचारक व आवताडे गटाकडून होणार्या फोडाफोडीच्या राजकारणाला धक्का बसला असून पुन्हा एकदा भारतनाना अशी भूमिका मतदारांनी घेतल्याचे दिसत असून फोडाफोडी करण्यापेक्षा जनतेची कामे केली असती तर विरोधकांवर  दुसऱ्याची माणसे फोडून बहुजन समाजात फूट पाडण्याची वेळ आली नसती अशी चर्चा होत आहे

Pages