सभासदांनीच सहकारी संस्था जपल्या पाहिजेत:-दामोदर देशमुख - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 28, 2019

सभासदांनीच सहकारी संस्था जपल्या पाहिजेत:-दामोदर देशमुख


बळीराजा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..


मंगळवेढा/प्रतिनिधी

      महाराष्ट्र राज्यात सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने,सहकारी सुतगिरण्या ,सहकारी बँका,सहकारी पतसंस्था,सहकारी दुधसंस्था इत्यादीचे योगदान मोठे आहे.सध्या सहकारी संस्थामध्ये अपप्रवृत्तीची माणसे आल्यामुळे सहकारी संस्थाविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.सहकारी संस्थावरील विश्वास कमी होत चालला आहे.त्यासाठी सहकारी संस्थामधील सभासदांनीच नितीमान व चारिन्न्य संपन्न माणसाच्या हातात सहकारी संस्थाची धुरा देवून आपल्या सहकारी संस्था जपल्या पाहिजेत." असे उदगार बळीराजा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दामोदर देशमुख यांनी बळीराजा पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेंच्या अध्यक्ष पदावरून बोलताना काढले.बळीराजा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत मंगळवेढा मध्ये उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. कार्यक्रमाची प्रस्तावाना जेष्ठ संचालक लक्ष्मण माने यांनी केले व अहवाल वाचन व्यवस्थापक सूर्यकांत केदार यांनी केले.
         पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, १९४७ नंतर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सहकारातून ग्रामीण भागाची समृध्दी व्हावी म्हणून सहकारी संस्थांना सरकारी मदतीने धोरण आखले.त्यातूनच १९४८ साली पदश्री कै.विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला सहकारी साखर कारखाना जन्माला घातला.सुरूवातीच्या काळात महाराष्ट्रातील अनके समाज धुरीणानी सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम करून दाखविले त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला झाला.पुढील काळात सहकारी संस्थांचा वापर राजकारण व वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू झाला.त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत आहे.काही चांगली माणसे अजूनही सहकारामध्ये आहेत म्हणून सहकार क्षेत्र जिवंत आहे.
        बळीराजा सहकारी पतसंस्था त्यापैकीच एक आहे.केवळ ३६ हजाराच्या भागभांडवलावर १५ ऑगस्ट १९९४ साली ८×१० च्या भाडयाच्या जागेत सुरू झालेल्या पतसंस्थेचा व्यवसाय जवळपास १६० कोटीवर गेलेला आहे.संस्थेच्या मालकीच्या ४ इमारती असून रूक्मिणीमाता मूलींचे वसतीगृह या संस्थेच्या आर्थिक सहकार्यातूनच बांधलेले आहे.ग्रामीण भागातील सर्व सामान्य माणसाला आधार देण्याचे काम गेली २५ वर्षे या संस्थेने प्रामाणिकपणे केले आहे जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे व थोर स्वातंन्न्य सेनानी कै.क्रांतीवीर नागन्नाथ नायकवाडी यांच्या विचारानुसार संस्थेचे कामकाज करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे असे देशमुख म्हणाले.
     यावेळी १० वी व १२ वी मध्ये ८० टक्केच्या पुढे मार्क मिळालेल्या गुणवंत विद्याथ्र्यांचे सत्कार करण्यात आले.तसेच सभासदांचे मनोगत यामध्ये डॉ.सोनाली देशमुख,उज्वला पाटील,शिवाजी ताड यांनी आपली संस्थेविषयी मनोगते व्यक्त केली.
      कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक, सल्लागार, हितचिंतक, कर्मचारी, व सभासद वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.,सदरची सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तात्यासाहेब चव्हाण तर आभारप्रदर्शन श्रीधर भोसले यांनी केले

Pages