पंढरपूर येथे पतंजली राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 20, 2019

पंढरपूर येथे पतंजली राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न...पंढरपुर/प्रतिनिधी

        पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिरा जवळील तुकाराम भवन येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी पतंजली योग पीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी व हरियाणा योग परिषदेचे चेअरमन मा.डॉ.जयदीपजी आर्य यांनी मार्गदर्शन केले. योगा भारतीय संस्कृतीचा मुळ आधार असून जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी योग हाच एकमेव पर्याय असल्याचा संदेश त्यांनी या कार्यशाळेच्या मार्गदर्शन करतांना दिला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,श्री विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर तसेच शकुंतला नडगिरे, पतंजली राज्य प्रभारी बापू पडळकर, पतंजली महिला राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, युवा भारत जिल्हा प्रभारी श्रीरामजी लाखे उपस्थित होते.
       या कार्यशाळेची सुरूवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रूक्मिणी व महाराष्ट्राचा जाणता राजा छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रथम चरणात पतंजली योग समिती सोलापूरच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सहभागी 16 जिल्ह्यांच्या कार्य प्रगतीचा अहवाल पीपीटीच्या माध्यमातून सादर केला गेला. शिक्षक निर्माण अभियानाच्या निकषावर उत्कृष्ट कार्य करणार्‍या साधकांचा डॉ.जयदीपजी आर्य यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
        या कार्यशाळेच्या द्वितीय चरणात श्रीरामजी लाखे व ज्ञानेश्वर आर्य यांनी योग शिबिर तसेच सहयोग शिक्षक शिबिरांचे आयोजन करतांना कसे नियोजन करावे यावर विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे पुर्व, पुणे पश्चिम, पिंपरी-चिंचवड व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी योगशिक्षक व कार्यकर्ता असे 300 लोकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सकाळी 6 ते 7.30 या वेळेत ध्यान व प्राणायाम शिबिर डॉ.जयदीप आर्य यांनी आपल्या सुंदर शैलीत घेत ध्यान, ध्यानाचे फायदे, प्रकार व प्राणायामातील सुक्ष्म बारकावे अतिशय विस्तृतपणे स्पष्ट केले. सर्व कार्यकर्त्यांना ध्यानाची एक वेगळी अनुभूतीचा अनुभव करून दिला. शिबिरानंतर वैदिक पध्दतीने यज्ञ करण्यात आला. बुधवार दि.18 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी योग शिबिर त्यानंतर होम-हवन यज्ञ करण्यात आला. सकाळी 9 वाजता कार्यशाळेचा समारोप समारंभात मार्गदर्शन करताना कर्तव्य व सेवा यांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत योग पोहोचवणे त्यासाठी ग्रामसमिती, वॉर्ड समिती गठित करणे हे आपले आगामी काळातील उद्दीष्ट असेल असे सांगितले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पतंजली योग पिठाच्या माध्यमातून आगामी काळात योग शिबिरातून योग-सेवा, गोसेवा व गो संवर्धन आचार्यकुलमच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती करून राष्ट्रसेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे यजमानपद पतंजली योग समिती, सोलापूरला देण्यात आले होते या कार्यशाळेच्या नियोजनांमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष मा.श्री अतुलजी भोसले यांचे सहकार्य लाभले. जिल्हा समितीचे संतोष दुधाळ दिलीप कोरके, नितीन मोरे, नवनाथ माने यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्तात्रय नवले, सुधीर अढवळकर, विनायक कवठाळकर, मधुकर सुतार, अरूण भोसले, लखन पडळकर, मिलिंद वाईकर, हनुमान सिंग परदेशी, विश्वनाथ काशेट्टी, प्रफुल्लता स्वामी, महानंदा धुमाळ, पडळकर, राजेश क्षिरसागर, संगीता वाघ, विजय कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Pages