पंढरीतील 200 पुरबाधीत कुटुंब अद्यापही अनुदानापासुन वंचीत... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 21, 2019

पंढरीतील 200 पुरबाधीत कुटुंब अद्यापही अनुदानापासुन वंचीत...


अनुदान मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील नगरसेवक:-विक्रम शिरसट

पंढरपूर/प्रतिनिधी
     पंढरीतील 200 पुरबाधीत कुटुंब अद्यापही शासकीय अनुदानापासुन वंचीत राहिल्याने सदर कुटुंबांना अनुदान मिळवुन देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करुन सदर कुटंबांना अनुदान मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे चंद्रभागेला आलेला पुर ओसरल्यापासुन पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना शासकीय अनुदान मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु ज्यांच्या घरामध्ये 10-10 फुट पाणी गेलेले होते अशा पुरबाधीत 200 कुटुंबांना अद्यापही शासकीय अनुदान मिळालेले नाही. व्यास नारायण झोपडपट्टी, लखुबाई पिछाडी, चंद्रभागेच्या पैलतीरावरील जुना सोलापूर नाका परिसर, सरकारी दवाखाना परिसर आदी भागातील या 200 कुटुंबांना अनुदान मिळवुन देणे हे आमचे कर्तव्य आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर आमचा पाठपुरावा सुरु आहे. दि. 19 सप्टेंबर रोजी याबाबतची माहिती पंढरपूर तहसिल कार्यालयात जावुन दिली आहे. अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली आहे.
अनुदानापासुन वंचीत राहिलेली सर्व कुटुंबं ही गोरगरीब आहेत. मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या या गरीब बंधु-भगिणींना लवकरात लवकर अनुदान द्यावे. अशी विनंती संबंधीत प्रशासकीय अधिकार्‍यांना केली आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन आचारसंहीता लागु झाल्याने आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असलेल्या वंचीत कुटूंबीयांना आम्ही थांबवले आहे. परंतु जर सदर कुटुंबांना वेळीच न्याय मिळाला नाही तर पुढील काळात लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करावे लागेल. अशी माहितीही नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली आहे.
        19 सप्टेंबर रोजी पंढरीतील चंद्रभागेला आलेल्या पुरानंतर शासकीय अनुदानापासुन 200 कुटुंब वंचीत राहिले असल्याची माहिती पंढरपूर तहसिल कार्यालयात जावुन दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक विक्रम शिरसट आदींसह वंचीत 200 कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Pages