पंढरीत पुरामुळे व्यासनारायण झोपडपट्टीतील 20 कुटुंबांचे रामबागेत स्थलांतर... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 27, 2019

पंढरीत पुरामुळे व्यासनारायण झोपडपट्टीतील 20 कुटुंबांचे रामबागेत स्थलांतर...


नगरसेवक विक्रम शिरसट यांचेकडून जेवणाची सोय..

पंढरपूर/प्रतिनिधी
         चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठावरील व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. पुराच्या धोक्यामुळे येथील 20 कुटंबांचे राम बागेत स्थलांतर करण्यात आले. या सर्व स्थलांतरीत कुटुंबाची नाष्ट्याची व जेवणाची सोय पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट व नगरसेवक विक्रम शिरसट  यांचेकडून करण्यात आली आहे.
        मागील महिन्यातच येथील कुटुंबांचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले होते; परंतु 350 पुरबाधीत कुटुंबापैकी 200 कुटुंबांना शासकीय मदतच मिळाली नसल्याने  आज यातील ज्यांच्या घरात पाणी शिरले त्या कुटुंबातील नागरिक स्थलांतर करण्यास तयार नव्हते. परंतु लक्ष्मणराव शिरसट व नगरसेवक विक्रम शिरसट,  भारत माने आदींनी या नागरिकांना विश्‍वासात घेवुन शासकीय मदत मिळवुन देण्याचे आश्‍वासन  दिल्यानंतर सदर नागरिक स्थलांतरीत होण्यास तयार झाले. अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
       व्यासनारायण झोपडपट्टी व अंबिका नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना  पुरापासून वारंवार  त्रास होऊ नये म्हणून पूर रेषा आखून पूररेषेच्या आत मध्ये शासनाने आहे  त्या  ठिकाणी घरे बांधून द्यावीत. व मागील महिन्यात आलेल्या पुरामधील पुरबाधीत नागरिकांना व आत्ता पुन्हा स्थलांतरीत झालेल्या पुरबाधीत नागरिकांनाही तातडीने शासकीय मदत मिळावी. अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे.

Pages