कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या चित्रांचे आजपासून प्रदर्शन.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, August 23, 2019

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या चित्रांचे आजपासून प्रदर्शन....

सोलापूर/प्रतिनिधी

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या विविध चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (शनिवारी) सकाळी 11 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे होणार आहे.
     पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यासह चित्र प्रेमी नागरिक भेट देणार आहेत. कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी काढलेल्या ऑइल, वारली, ॲबस्ट्रॅक्ट, फिलामेंटरी या प्रकारच्या सुंदर चित्रे पाहण्यासाठी सोलापूरकरांनी भेट द्यावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

Pages