मंगळवेढा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..पोलिसांना 12 घरफोडया उघड करन्यात यश..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, April 5, 2023

मंगळवेढा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..पोलिसांना 12 घरफोडया उघड करन्यात यश.....

13 लाख 50 हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त,दोघे चोरटे जेरबंद
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहरात भर दिवसा बंद घरे फोडीची मालिका सुरु असल्याने चोरटयांना जेरबंद करणे स्थानिक पोलिसांना आव्हान होते. दरम्यान हे आव्हान डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी स्विकारून कर्तबगार पोलिसांची टिम तयार करून 12 घरफोडया व 2 मोटर सायकली चोरीचे गुन्हे सी.सी.टि.व्ही कॅमेराच्या माध्यमातून उघड करून शिक्षण घेण्याच्या वयात चोर्‍या करणार्‍या प्रदिप धनाजी हेंबाडे (वय 20,ढवळस रोड)व अजित बिरू मेटकरी (वय 23,धर्मगांव रोड,मंगळवेढा) यांना जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मंगळवेढा शहरामध्ये रात्रीच्या ऐवजी भर दिवसा बंद घरे टार्गेट करून हातोहात लोकांच्या नजरा चुकवून बंगले फोडण्याची मालिका सुरु होती. या दरम्यान वृत्तपत्रामधून चोरटे शोधणे पोलिसांना आव्हान या मथळयाखाली वृत्त प्रसिध्द झाले होते.भर दिवसा होणार्‍या चोरीच्या घटनेमुळे लोकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.वृत्ताची दखल घेवून पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाली विशेष क्राईम कामगिरी करणार्‍या पोलिसांची टिम तयार करून रेकॉर्डवरील गुन्हे चेक करणे,नाकाबंदी करणे,तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे तपास करणे,सांगोला,पंढरपूर,मोहोळ,अकलूज,सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील अन्य गुन्हेगार व परराज्यातील गुन्हेगारांचा अभ्यास करीत असताना मंगळवेढा शहरात संशयितरित्या वरील दोन आरोपी सातत्याने गल्लीबोळातून फिरत असल्याचे पोलिस पथकांच्या निदर्शनास आले. याचा कायदेशीर आधार घेण्यासाठी मित्रनगर परिसरातील एका व्यवसायिकाकडून फुटेज हस्तगत केले व याची तपासणी केली असता वरील संशयित आरोपी हे सातत्याने गल्ली बोळातून रेकी करीत असल्याचे निदर्शनास येताच त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून बोलते केले असता चौकशीत 12 घरफोडया व 2 मोटर सायकलची चोरी केल्याची कबुली दिली. हया चोर्‍या जानेवारी महिन्यापासून सायंकाळी 6.00 ते रात्री 8.00 च्या दरम्यान व भर दुपारीही शिक्षक कॉलनी,मित्र नगर,वनराई कॉलनी,सप्तश्रृंगी नगर,चैतन्य कॉलनी,बनशंकर कॉलनी तसेच ग्रामीण भागात झाल्या होत्या,यापुर्वी पोलिसांनी जुने दरोडयातील चोरटेही जेरबंद केले होते.मात्र भर दिवसा होणार्‍या बंगले फोडतील चोरटे पकडणे पोलिसांना एक आव्हान ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला होता.
या तपासात चोरटयांकडून 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे 25 तोळयाचे सोन्याचे दागिने,1 लाख रूपये किमतीच्या दोन मोटर सायकली असा एकूण 13 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी चोरटयाकडून हस्तगत केला आहे.ही कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुहास जगताप, पोलिस निरिक्षक रणजित माने,स.पो.नि.अंकुश वाघमोडे,सत्यजीत आवटे,हजरत पठाण,दयानंद हेंबाडे,पोलिस नाईक सुनिल मोरे,पोलिस शिपाई अजित मिसाळ,अजय शिंदे,हंडप्पा हत्ताळे,कैलास खटकळे,व सायबर कडील युसूफ पठाण यांनी या कामी परिश्रम घेतले.

Pages