धक्कादायक :- यल्लमा देविचे दर्शन घेऊन परतत आसताना ब्रम्हपुरीजवळ झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू तर एकजण जखमी.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 22, 2022

धक्कादायक :- यल्लमा देविचे दर्शन घेऊन परतत आसताना ब्रम्हपुरीजवळ झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू तर एकजण जखमी....

वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
ब्रम्हपुरी येथे मोटर सायकलस्वारास पाठीमागून पिक अप वाहनाने ठोकरल्याने तीघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून तीघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी श्रीशैल्य प्रशांत देशमुखे(रा.ब्रम्हपुरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी मल्हारी तायाप्पा पाराध्ये(रा.ब्रम्हपुरी) यांचे सासरे मयत सोपान तायाप्पा भालेराव (वय 50),सासू जयश्री सोपान भालेराव(वय 45 दोघे रा.परमेश्‍वर पिंपरी),नात प्रज्वला उर्फ वाघ्या प्रशांत भालेराव (वय 5 वर्षे),मावस सासू कस्तूरा तुकाराम साठे(वय 40 रा.हिरज) आदीजण पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लामा देवीच्या यात्रेस जावून परत गावाकडे जात असताना दि.20 रोजी 6.45 वाजण्याच्या दरम्यान मंगळवेढा-सोलापूर रोडवरील ब्रम्हपुरी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एम एच 13,सी.जे.0662 या पिक अपने एम एच 13,डी.एल.9675 या मोटर सायकलला पाठीमागून वेगाने येवून धडक दिल्याने सोपान भालेराव,जयश्री भालेराव,कस्तुरा साठे हे तीघेजण जखमी होवून जागेवर मयत झाले तर पाच वर्षीय प्रज्वला ही गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर आरोपी तथा चालक श्रीशैल्य देशमुखे हा वाहनासह स्वतः मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्याचे सांगण्यात आले.तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे यांनी त्यास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला.मयत कुटूंबिय हे देवाला गेल्यामुळे तेथील प्रसाद घेवून गावाकडे जात असताना वाटेत अपघात झाल्याने अपघातस्थळी मोठया प्रमाणात देवाचा प्रसाद व कपडे,खेळणी अस्ताव्यस्त पडल्याचे चित्र होते. मागील दीड महिन्यापुर्वी याच ठिकाणी ब्रम्हपुरी येथील तरूण मुलगा सरवळे याच्या मोटर सायकलचा अपघात होवून तोही याच ठिकाणी मयत झाला होता. या परिसरात आत्तापर्यंत जवळपास अर्धा डझन अपघात झाले आहेत.येथे राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांनी अपघातग्रस्त क्षेत्र या नावाचा फलक लावून वेगावर नियंत्रण आणावे अशी मागणी या अपघातानिमित्त नागरिकांतून पुढे येत आहे.सध्या मंगळवेढा-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग सुपर झाल्यामुळे वाहने अतीवेगाने जातात.परिणामी दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होवून नाहक जीव बळी जात आहेत.

Pages