स्वेरीच्या अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांना बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 24, 2022

स्वेरीच्या अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांना बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक....

पंढरपूर/प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेत परीपक्व बनविण्याचा ध्यास घेतलेली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील ‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच अग्रेसर आहे असे नव्हे तर आता क्रीडा विभागात देखील चमकदार कामगिरी केल्यामुळे स्वेरीचा झेंडा डौलाने फडकत असल्याचे स्पष्ट होते. नुकत्याच पंढरपुरात झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये स्वेरीच्या अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांनी सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजिलेल्या विद्यापीठ स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी अविराज विजयकुमार नागटिळक यांनी ६३ किलो ते ६७ किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी होवून सुवर्णपदक (गोल्ड मेडल) मिळविले. तसेच एमबीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या चैताली पांडुरंग बुरांडे यांनी ६६ किलो ते ७० किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी होवून सुवर्ण पदक मिळविले. डिसेंबर २०२२ मध्ये हरियाणात होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांची निवड झाली आहे. दोघांना स्वेरीचे क्रीडा मार्गदर्शक प्रा. संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आरोग्य उत्तम राहावे यासाठी नियमित ‘योगा’ करून घेतला जातो.
स्वेरीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी असलेल्या स्वतंत्र वसतिगृहात अत्याधुनिक मशिनरी असलेल्या जीमची सोय आहे. अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावल्यामुळे त्यांचा स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक मिळविल्याबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांचे अभिनंदन केले आहे.
स्वेरीच्या अविराज नागटिळक व चैताली बुरांडे यांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे त्यांचा सत्कार करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सोबत डावीकडून क्रीडा मार्गदर्शक प्रा. संजय मोरे, अॅड.विजयकुमार नागटिळक, सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, चैताली बुरांडे, पांडुरंग बुरांडे व संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे.

Pages