मंगळवेढा ब्रेकिंग:-आंधळगावांत बँक ऑफ इंडियाचे.ए.टी.एम.फाेडन्याचा चाेरट्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने २८ लाख बचावले..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, July 7, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:-आंधळगावांत बँक ऑफ इंडियाचे.ए.टी.एम.फाेडन्याचा चाेरट्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने २८ लाख बचावले.....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

            आंधळगाव येथील बँक ऑफ इंडियाचे  एटीएम  अज्ञात चोरट्याने फोडले मात्र आतील लाँक न उघडल्याने त्यातील २८ लाख सुरक्षित राहीले आहेत.दरम्यान रात्री उशिरापर्यंत बँकेने पाेलीसात तक्रार दाखल केली नव्हती.

          

                         दि.७ च्या  पहाटे अज्ञात चोरट्यांनी आंधळागांव गावात असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्या चे धाडस केले आहे या एटीएमला कोणताही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांनी एटीएम मध्ये घुसून एटीएम फोडले बाहेर असणारा सीसीटीव्ही कॅमेरा व मशीनवरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून मशीन फोडली परंतु जिथे रक्कम ठेवलेली असते तो बॉक्स फोडण्यास चोरट्यांना न जमल्यामुळे ते तसेच सोडून गेले एटीएम मशीनचे वरील भागाचे नुकसान केलेले आहे चोरट्यांना जरी रक्कम चोरून नेता आली नसली तरी या एटीएममध्ये संबंधित एजन्सीने दिनांक 6 रोजी रक्कम टाकली होती चोरट्यांनी एटीएम फोडते वेळी तिथे 28 लाख 900 रुपये इतकी रक्कम होती जर ही रक्कम नेली असती तर त्याचा फटका संबंधित एजन्सीला बसला असता येथे गेल्या दोन वर्षापासून कोणताही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हे एटीएम कायमस्वरूपी उघड्या स्वरूपात राहिलेले आहे.

             संबंधित घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मी दहिवडी येथील अधिकाऱ्यांना व  मंगळवेढा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडले असले तरी संबंधित अधिकारी अथवा एटीएम चालवणाऱ्या एजन्सी यांनी कोणतीही याबाबत फिर्याद उशिरापर्यंत दिली नव्हती.



Pages