मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात लसिकरणाबाबत हम..करे..साे..कारभार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर यांनी दिला आंदाेलनाचा इशारा..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, July 4, 2021

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात लसिकरणाबाबत हम..करे..साे..कारभार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर यांनी दिला आंदाेलनाचा इशारा.....दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे लसिकरणाच्या बाबतीत सावळा गोंधळ सुरु असुन तालुक्याला १८ ते ४४ व ४५ च्या पुढील डोस आले किती व प्राथमिक उपकेंद्र यांना डोस दिले किती याची दैनंदिन माहीती मिळत नसल्यामुळे हमकरेसाे आसा प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आसल्याने लसी बाबत नागरीक त्रस्त झाले आसुन ग्रामीण रूग्णालयातील लसीची माहीती त्वरीत द्यावी आन्यथा आंदाेलन छेडन्याचा इषारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष आौदूंबर वाडदेकर यांनी दिला आहे.

            राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता  वर्तविली जात असताना लसिकरण नेमके कुठे आहे?लस किती आली  हेच लोकांना माहीत हाेत नसल्याने आनेकजन या लसिपासून वंचित राहात आहेत.तालुक्यामध्ये सध्या लसिकरणाचा तुटवडा भासत असताना दररोज पंधरा ते विस डोस डॉक्टर आपआपल्या जवळचे मिञ,नातेवाईक यांना बोलवुन लसिकरण करत असल्याचे ग्रामीण रुग्णालय येथे आढळुन येत आहे.अनेकांनी लसिकरणाचा पहिला डोस घेवुन तिन तिन महीने उलटुन गेले आहेत त्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने नागरीक अस्वस्थ झाले आहेत.

                  ज्या नागरीकांनी लसिकरणाचा पहीला डोस घेतला आहे.त्यांना दुसरा लसिकरणाचा डोस देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.लसिकरणासाठी आँनलाईन नोंदणी करा मगच लस देवु असे डॉक्टर सांगतात परंतु ज्यांनी आँनलाईन नोंदणी पहील्या व दुसऱ्या डोससाठी केली आहे त्यांची नावे यादीमध्ये असताना अशा नागरीकांनाही लस देण्यासाठी दररोज काहीतरी कारणे देवुन त्यांना माघारी पाठविण्याचा कारभार ग्रामीण रुग्णालय येथे सुरू आहे.जे पहीला अथवा दुसरा डोस घेण्यासाठी नागरीक येतात त्यांना आॉनलाईन नोंदणी केली आहे का आणी ज्यांनी आँनलाईन नोंदणी केली आहे अशांना आँफलाईन करा म्हणून सांगितले जात आसल्याने संभ्रम निर्माण हाेत आहे.

Pages