कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेवून,निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडा उपजिल्हाधिकारी:-अनिल कारंडे - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 8, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेवून,निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडा उपजिल्हाधिकारी:-अनिल कारंडे

 

दिव्य न्यूज नेटवर्क

               पंढरपूर विधासभा मतदारसंघातील पोट निवडणूक कोरोनाच्या कालावधीत पार पडत असल्याने,  निवडणूक  प्रक्रीयेतील सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन  निवडणूकीचे कामकाज सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी नेमूण दिलेल्या जबाबदाऱ्या आवश्यक खबरादरी घेवून समन्वयाने पार पाडाव्यात अशा सूचना उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांनी दिल्या.

               252-पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस  सहायक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, उपअधिक्षक सुर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, निशिकांत प्रचंडराव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविद गिराम, डॉ.प्रमोद शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होती                                       


                 निवडणूक कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे, मतदानासाठीच्या रांगेत सामाजिक अंतर राखले जाईल यासाठी नियोजन करावे, मतदान केंद्राच्या ठिकाणी सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था,मास्क, हॅण्डग्लोज, फेसश्लिड मास्क व अन्य आवश्यक साहित्य वेळेत पुरविले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य पथक सज्ज ठेवावेत अशा सूचनाही   यावेळी उपजिल्हाधिकारी कारंडे यांनी यावेळी दिल्या.     

                  निवडणूकीच्या कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या आदेशान्वये समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे असून, सदस्य म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख व पोलीस उपअधिक्षक सुर्यकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

                यावेळी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी  केलेल्या कार्यवाही व उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला.

          नियुक्त मतदान अधिकारी  व कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी  यांच्यासाठी  मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हातमोजे आदींचा समावेश असलेले किट देण्यात येणार असून, मतदार संघात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

Pages