मंगळवेढा ब्रेकिंग:-मंगळवेढ्यात आज आढळले ७९ पाँझीटीव्ह रग्ण,ऐका महिलेचा मृत्यू..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, April 12, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:-मंगळवेढ्यात आज आढळले ७९ पाँझीटीव्ह रग्ण,ऐका महिलेचा मृत्यू.....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

            मंगळवेढा तालुक्यात आज 79 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये नागरी भागात 27 तर ग्रामीण मध्ये 52 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे .

             

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात काेराेनाने डोके वर  काढल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. सद्या पंढरपुर _मंगळवेढा निवडणूक लागल्याने मंत्र्याची सभेसाठी वर्दळ वाढल्याने काेराेनाचे नियम पायदळी तूडवत सभांना भरगच्च गर्दी वाढत आहे.परिणामी काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. दामाजी ग्रामपंचायत व चोखामेळा ग्रामपंचायत  भाग ग्रामपंचायत प्रशासनाने सिल केला आहे .कोरणा पॉझिटिव्ह  रुग्णांची व्यवस्था रुक्मिणी माता मुलींचे वस्तीग्रहात केली आहे.

          जिल्ह्यामध्ये आज 641 पॉझिटिव्ह आले आसुन  त्यामध्ये 397 पुरुष व 243 महिला आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ मयत आाज झाले आहेत. त्यामध्ये खडकी(ता.मंगळवेढा) येथिल  70 वर्षाची वृद्ध महिला दिनांक 7 रोजी सिव्हिल मध्ये  ऍडमिट केले होते. दिनांक ८ रोजी रात्री बारा  वाजता मयत झाली .मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण माळशिरस मध्ये 131 आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात तेराशे जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 933 पुरुष तर 367 स्त्री आहेत . काेराेना प्रारंभापासुन .52 हजार 511 एवढे रूगण पाँझीटीव्ह आले आहेत.

Pages