पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या बैठकीत 'भाजप' पदाधिकाऱ्यांत किरकोळ कारणावरून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 2, 2021

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या बैठकीत 'भाजप' पदाधिकाऱ्यांत किरकोळ कारणावरून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार...

 

मंगळवेढा/प्रतिनिधी

                पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवेढा येथे भाजपा पदाधिकारी यांच्या  बोलावलेल्या बैठकीत  किरकोळ कारणावरून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत असा प्रकार घडल्याने कार्यकर्त्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.

               पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातुन भाजपाकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्या प्रचाराचे नियोजन संदर्भात मंगळवेढा येथील एका मंगल कार्यालयात  दि.01 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा आ प्रशांत परिचारक,उमेदवार समाधान आवताडे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते येथील माजी नगरसेवक हे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याशी निवडीसदर्भात चर्चा करीत असताना येथील पश्चिम भागातील एक युवक नेते यांच्यात काही कारणावरून तू तू मैं मैं चा प्रकार झाला यावेळी येथे उपस्थित असणारे माजी नगरसेवकांच्या मुलाला आपल्या वडिलांना त्या युवक नेत्याने बोलल्याचे सहन झाले नाही त्यामुळे दोघात तू मी होऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार झाला.         

           भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो परंतु ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीतच असा राडा झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे निवडणुकीत रंग भरत असतानाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये  धुळवड सुरू झाल्याने याची चर्चा मात्र सर्वत्र  होत आहे.

Pages