आमदार भारत भालके यांचे निधन पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, November 28, 2020

आमदार भारत भालके यांचे निधन पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास....


दिव्य न्यूज नेटवर्क

              राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पोस्टकोविडमुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी  मध्यरात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके यांना कोविड-१९ झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होते. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ नोव्हेंबर) रोजी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.

Pages