प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील घरांचे पंचनामे लवकर करून नुकसान भरपाई द्यावी :- शरद कोळी - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 16, 2020

प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील घरांचे पंचनामे लवकर करून नुकसान भरपाई द्यावी :- शरद कोळी

बेगमपूर/प्रतिनिधी 

             नदीकाठावरील पुरग्रस्त भागाला धाडस संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई  मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.यावेळी बोलत असताना शरद कोळी यांनी  सगळीकडे पुराने थैमान घातले आहे.भिमानदीच्या खोऱ्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत.नदीकाठी राहणा-या नागरिकांच्या घरात पाणी शिरले असुन लोकांची गैरसोय होत आहे.

         

 पुराच्या पाण्यामध्ये अनेकांच्या घरातील जिवनावश्यक वस्तु वाहुन गेल्या आहेत.बेगमपुर येथील साठे नगर, भोई वस्ती, महादेव मंदीर परीसर येथील घरांमध्ये पाणी शिरले असुन आद्याप पर्यंत कोणत्याही  अधिकारीनी येथे भेट दिली नाही.म्हणुन आपण धाडस संघटनेच्या वतीने अधिकारी वर्गाला विनंती करत आहोत की प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन नुकसान ग्रस्त घरांचे पंचनामे करून पुरामुळे  अडचणीत आलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा अश्या प्रकारचे मत व्यक्त केले आहे.


तसेच प्रशासनाने पंचनामे करत असताना सरसकट   पंचनामे करून कोणत्याही प्रकारची हयगय न करता सर्वांना न्याय देण्याची भुमिका घ्यावी पुरामुळे शेतकरी वर्गही अडचणीत आला असुन पिक पंचनामे  करुन  भरपाई मिळवून द्यावी आश्या प्रकारची मागणी केली .

Pages