अखेर लाच प्रकरणात सापडलेले मंडल अधिकारी निलंबीत... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, October 14, 2020

अखेर लाच प्रकरणात सापडलेले मंडल अधिकारी निलंबीत...

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

            हुलजंती येथील मंडल अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे याने दहा हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणात पोलिसांनी अटक करून 48 तासापेक्षा अधिक काळ कारागृहात ठेवल्याने  त्या मंडल अधिकार्‍यास  जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांनी सेवेतून निलंबीत केले आहे.दरम्यान याचा आदेश नुकताच मंगळवेढा तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे.

           

  मंडलाधिकारी सत्यवान घुगे हे हुलजंती मंडलमध्ये कार्यरत असून तक्रारदार याने लवंगी येथे  एक एकर क्षेत्र विकत घेतले होते.या जमिनी खरेदीच्या दस्तावर हरकत घेतल्याने तसा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी घुगे यांनी दि.23 सप्टेंबर रोजी  10 हजाराची लाच तहसील कार्यालयात स्विकारत असताना सोलापूर येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घुगे यांना अटक केली होती.

               पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर घटनेचा अहवाल लाच लुचपत विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्या मंडल अधिकार्‍यास तात्काळ  सेवेतून  निलंबीत करीत असल्याचा आदेश काढला होता. हा आदेश नुकताच मंगळवेढा तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे.
               दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील 8 अन्वये विभागीय चौकशीकरीता दोषारोपपत्र पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.सध्या घुगे यांच्या नेमणूकीचा आदेश सोलापूर येथील करमणूक अधिकारी कार्यालयाकडे झाला असल्याचे सांगण्यात आले.

Pages