कर्तव्यदक्ष आधिकारी किरण उंदरे यांच्या बदलीचा आट्टाहास कशासाठी? गौरव खरात.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 6, 2020

कर्तव्यदक्ष आधिकारी किरण उंदरे यांच्या बदलीचा आट्टाहास कशासाठी? गौरव खरात..


मोहोळ/प्रतिनीधी            
           कोरोणासदृश परिस्थिती आपल्या देशासह जगभरामधे धुमाकुळ घालत आहे .तरी काही लोकांना कर्तव्यदक्ष अधिकारांच्या बदल्या करण्यामागे स्वारस्य असल्याचे दिसत असुन ता.मोहोळ कामती पो.स्टे.चे कर्तव्यदक्ष स.पो.नि.उंदरे यांच्या बदली करण्यामागे होत असलेल्या मागणीवरून निदर्शनास येत आहे. 
तरी काही दिवसांपासून काही मंडळी कामती येथील सहा.पो.नि.किरण उंदरे यांची बदली होणेकामी शासनदरबारी प्रयन्त करताना दिसत आहेत.  परंतु उंदरे यांच्यासारख्या  प्रामाणिक,कर्तव्यदक्ष सामाजिक भान आसणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात येवू नये असा सुर सामान्य जनमानसातून येत आहे.
            मागील दोन वर्षापासुन कामती पो.स्टे.हद्दीमध्ये श्री.उंदरे यांनी कामती पो.स्टे.च्या स.पो.नि.चा कार्यभार स्वीकारल्यापासुन सदर भागा मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात आले असून सर्व गावातील अवैध धंदे सुद्धा बंद असून सर्व गावांमध्ये शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेचे दर्शन सर्व कामती पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे.तरी काही अवैद्य व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कायदा व सुव्यवस्थेचा बडगा उगारल्यामुळे व सर्व अवैद्य व्यवसाय करण्यावर तसेच गुन्हेगारी करण्याऱ्या लोकांवर आळा घातल्यामुळे काही असंतुष्ट लोक वारंवार स.पो.नि. किरण उंदरे यांच्यासाख्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदलीची मागणी करीत आहेत .
           सदर कोरोणा सदृश परिस्थितीमधे सुद्धा श्री.उंदरे यांनी आपल्या कामती पो.स्टे.येथील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक गावामध्ये प्रशासन व ग्रामस्थांचा दुवा बनुन लाॅकडाऊन च्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्याबरोबरच अवैध व्यवसायावर व गुन्हेगारीवर अंकुश ठेवला आहे.त्यामुळे येथील काही असंतुष्ट लोक अशा कर्तबगार अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी करीत आहेत.
       

   सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित विभागाचे अध्यक्ष मा.गौरव खरात यांनी या पत्रकाद्वारे असे अवाहन केले आहे की, कामतीचे स.पो.नि.किरण उंदरे हे अत्यंत प्रामाणिक ,कर्तव्यदक्ष व सामाजिक भान असणारे अधिकारी आहेत व त्यांनी कामती पो.स्टे.चा कार्यभार स्वीकारल्यापासुन कामती पो.स्टे.च्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली आहे.तसेच अनेक गुन्ह्याचा पर्दाफाश केला आसुन काही लोक त्यांच्या वैयक्तीक स्वार्थ्यापोटी कर्तबगार अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी करीत आहेत. कामती पो.स्टे.येथील स.पो.नि.किरण उंदरे यांची बदली करण्यात येवू नये आशी मागणी शासन दरबारी करणार आसुन तसेच वेळ पाडल्यास जनआंदोलन करु अशि महिती सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौरव खरात यांनी जपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.


Pages