दिलासादायक :- मंगळवेढा तालुक्यातील कोरोना पाँझिटिव्ह व्यक्ती पंढरपूर येथे वास्तव्यास उपविभागीय अधिकारी :- उदयसिंह भोसले.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 4, 2020

दिलासादायक :- मंगळवेढा तालुक्यातील कोरोना पाँझिटिव्ह व्यक्ती पंढरपूर येथे वास्तव्यास उपविभागीय अधिकारी :- उदयसिंह भोसले..


दिव्य न्युज नेटवर्क
          आज मंगळवेढा तालुक्यातील एका व्यक्तीचा करोना बाबतचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून  याबाबत अधिक माहीती अशी कि सदरची २३ वर्षीय व्यक्ती पंढरपूर मधील भक्तनिवास येथेच तात्कालिक वास्तव्यास असून नोकरी करीत आहे. त्याचे मूळ गाव जरी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ हे  गाव असले तरी तो लॉक डाऊन काळात कधीतरीच  गावी येत होता.
           गेल्या दीड महिन्यापासून तो गावी वास्तव करण्यास आलेला नाही व तसेच त्याचा काही कालावधी पूर्वी झालेला तात्पुरता प्रवास सुद्धा अल्प कालावधीसाठी असल्याने व त्यास ही पुरेशा सुरक्षित कालावधी उलटलेला असल्याचे चौकशी अंतिम निदर्शनास आलेले आहे.
             त्यामुळे या व्यक्तीचा केवळ कायमचा पत्ता मंगळवेढा असला तरी गेल्या दिड महिन्यापासून तो पाटखळ या गावी आलाच नसल्याने व तो जिथे काम करतो तेथील कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तो आला होता म्हणून त्या व्यक्तीचे पंढरपूर मध्येच त्याचे विलिनीकरण केले होते व तेथेच त्याचे नमुने घेण्यात आले होते आणि नमुना तपासणी साठी पाठविला असता.
     
 तो पॉझिटिव्ह आला आहे वरील वस्तुस्थितीचा विचार करता या व्यक्तीचा कारोना विषयक बाबींचा संपर्क हा पंढरपूर तालुक्याशी निगडित असल्याने व त्याचा संपर्क ही तेथेच निश्चित झाल्याने मंगळवेढा तालुक्यातून या व्यक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचे स्वीकृत दर्शनी दिसून येत आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात कंटेनमेंट झोन जाहीर  करण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाकडुन सदर प्रकरणी सतर्कता बाळगली असून आवश्यकते नुसार कार्यवाहीसाठी प्रशासन  सज्ज आहे.
 उपविभागीय अधिकारी :- उदयसिंह भोसले

Pages