पाटकळ मधील 'प्रशासन' यंत्रणा झोपली काय ? - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, July 1, 2020

पाटकळ मधील 'प्रशासन' यंत्रणा झोपली काय ?


    ताडी विक्री प्रकरण भाग :-01

दिव्य न्युज नेटवर्क 
            पाटकळ मध्ये अवैध धंद्यांना ऊत आला असून, राजरोसपणे चालणाऱ्या या धंद्याकडे लक्ष देण्यास गावातील प्रशासनव्यवस्था झोपली काय? असा सवाल नागरिकांमधून होत आहे. पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसुरक्षा दल, इत्यादी यंत्रणेने  गावाच्या हिताची दृस्टीने जागृक राहणे गरजेचे आहे. लाकडाउनच्या काळात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन चौकशी करणारी यंत्रणा, राजरोसपणे अवैद्य धंदे करणार्याकडे लक्ष देत नाही म्हणजे, याचा अर्थ काय? गावात काय चाललंय याची माहिती तालुकास्तरावरील यंत्रणेस का कळवित नाही? का त्यांनाच सामील आहे?
           
असे अनेक संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहेत. व्यसणाच्या आहरी गेलेल्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या 'सैतानाची' माहिती वरिष्ठांना कळवून बंदोबस्त करण्यास त्यात गैर काय आहे? तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, यांनी जरी जबाबदारी ने घेतलेल्या मोबदल्याची इमानदारीने कामे पार पडली, तरी त्या गावाचा विकास होण्यास निश्चित मदत होणार आहे. आणि जुगार, मटका, दारू विक्री,  इत्यादी अवैध धंद्यांना आळा बसण्यास मदत होईल. हे मात्र खरे.


Pages