रसायनमिश्रीत ताडी विकणारा 'पाटखळात' अवतरला ? - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 28, 2020

रसायनमिश्रीत ताडी विकणारा 'पाटखळात' अवतरला ?


अवैधरित्या रसायनमिश्रीत ताडी विक्रेत्यावर प्रशासन कारवाई करणार का ?

दिव्य न्यूज नेटवर्क
            पाटखळ ता. मंगळवेढा येथे राजरोसपणे रसायनमिश्रीत ताडी विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू असून या रसायनमिश्रीत ताडीचा मनमुरादपणे आस्वाद घेण्यासाठी हाजापुर,गणेशवाडी,खुपसंगी,खडकी,जुनोनी,नंदेश्वर,रेड्डे,गोणेवाडी,भोसे हुन्नुर व इतर गावातील असंख्य तळीराम पाटखळ नगरीकडे धाव घेताना दिसून येत आहेत.
         
रसायनमिश्रित ताडीमुळे अनेकजण व्यसनाच्या आहारी जात आहेत. या ताडीमुळे अनेकांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यात देशभरामध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक टंचाईशी सामना करावा लागत असताना या ताडी मुळे अनेकांना आजारी पडल्यामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
          त्यामुळे संबंधित विभागाने रसायनमिश्रीत ताडी विक्रीचा अवैधरित्या विक्री करणाऱ्या वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पाठखळ ग्रामस्थांमधून होत आहे.

Pages