दोन पोलिस स्टेशनचा क्राईम विभाग संभाळून हम भी कुछ कम नही महिला पोलिसांनी दिले दाखवून - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 7, 2020

दोन पोलिस स्टेशनचा क्राईम विभाग संभाळून हम भी कुछ कम नही महिला पोलिसांनी दिले दाखवून


मंगळवेढा/प्रतिनिधी
         मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस कार्यालयातील महिला पोलिस वंदना आयरे ह्या  मंगळवेढा व सांगोला या दोन पोलिस स्टेशनचा क्राईम विभाग तीन  वर्षापासून संभाळत आहेत.दरम्यान,क्राईम विभाग संभाळताना  पुरुष कर्मचार्‍यांनाही घाम फुटत असताना एक महिला पोलिस उत्कृष्ठ काम करून  हम भी कुछ कम नही हे दाखवून देत असल्याने त्यांचे  कार्यालयीन कामकाजात कौतूक होत आहे.
            मंगळवेढा येथे सन 2006 मध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयास मंजूरी मिळाली.या कार्यालयात मंगळवेढा व सांगोला या दोन पोलिस स्टेशनचा कारभार पाहिला जातो.सन 2017 पासून या कार्यालयात क्राईम विभागासाठी महिला पोलिस वंदना आयरे यांची नेमणूक झाली.सर्व पुरुष कर्मचारी असताना एक महिला कर्मचारी उत्कृष्ठपणे क्राईम संभाळत आम्ही महिलाही माघे नाहीत हे कामकाजावरून दाखवून दिले जात आहे.
     
  आत्तापर्यंत त्यांनी मंगळवेढा,सांगोला या दोन पोलिस स्टेशनचे क्राईम रेकॉर्ड अपडेट ठेवले असून यामध्ये वार्षिक तपासणी अहवाल, दैनंदिन गुन्यांच्या नोंदी, वरिष्ठ कार्यालय पत्रव्यवहार आदींच्या नोंदी संगणकावर बिनचूक ठेवले आहेत.क्राईम विभाग हा पोलिस स्टेशनचा आत्मा समजला जातो. वर्षभर घडलेल्या गुन्हयांच्या नोंदी व्यवस्थित करून ठेवणे ही महत्वाची जबाबदारी असते.  क्राईम विभागाचे कामकाज पाहण्यासाठी पुरुष कर्मचारीसुध्दा धजावत नाहीत.दरम्यान  गुन्हयांची वर्षभराची आकडेवारी याचा ताळमेळ घालणे  ही मोठी कसरत  असल्याने भल्या भल्यांना हा विभाग संभाळताना घाम फुटत असताना एक महिला पोलिस गेली तीन वर्षे हे बिनचूकपणे कामकाज करत आहे.मागील तीन महिन्यापुर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी डी.वाय.एस.पी.कार्यालयाला भेट दिली असता  अपडेट क्राईम विभागाचे कामकाज पाहून आयरे यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविले होते.आयरे हया सन 2007 च्या बॅचच्या असून  मंद्रूप,सोलापूर व मंगळवेढा येथे कामकाज केले आहे.
     "येथील पोलिस उपविभागीय कार्यालयात क्राईम विभागातील संगणकावर कामकाज करीत असणाऱ्या विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे महिला पोलिस वंदना आयरे

Pages