मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, April 1, 2020

मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात..मंगळवेढा/प्रतिनिधी
    मंगळवेढा शहरात शिवभोजन केंद्राची सुरुवात झाली आहे या केंद्राचे उध्दघाटन  तहसीलदार स्वप्नील तावडे, नगरपालिका मंगळवेढा चे मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नायब तहसीलदार एस आर मागडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
         यावेळी मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील ,जिल्हा नियोजन समितीचे अजित जगताप नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी,  देशसेवा कामगार युनियनचे अध्यक्ष आदित्य हिंदुस्तानी, कादरी साहेब,घाडगे साहेब,बनसोडे साहेब,कांबळे साहेब,गायकवाड साहेब, केंद्र प्रमुख श्रीकांत देवकर उपस्थित होते.
     
 कोरोना व्हायरसच्या उद्रेक झाल्यानंतर आपल्या भारत देशात बाधित यांची संख्या १७००च्यावर तर महाराष्ट्रात एकूण ३३०च्या वर जाऊन पोहोचली आहे. या आजाराला नियंत्रण मिळवण्यासाठी जनता कर्फ्यु त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन झाल्याने चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो रस्ते गजबजलेल्या बाजारपेठ अशा निर्मनुष्य झाल्या होत्या.कोरोनाच्या संकटात संयमाने व धैर्याने मुकाबला करण्याचा संदेश देशवासीयांना देण्यात आला. कोरोना जनजागृती देशसेवा, समाजसेवक (एन.जी.अो.), पीपल्स पाॅवर आॅफ नेशन (एन.जी.अो.),लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी च्या वतीने व्यापक जागृती करण्यात येत आहे.
     कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई-पुणे ठाणे पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
          कोरोना च्या प्रादुर्भावामुळे कामगार, मजूर ,निराश्रित निराधार लोकांसाठी शिवभोजन केंद्र सुरुवात करण्यात आले आहे तरी शिवभोजन केंद्रावर लोकांना पाच रुपयात जेवण मिळणार आहे. शिवभोजन केंद्र  संतोष हाॅटेल चोखामेळा चौक येथे आहे.गणेश धोत्रे, ज्ञानेश्र्वर कोंडूभैरी, साईनाथ शिंदे, गणेश मुदगुल,केशव आवताडे,दीपक कसगावडे,हर्षद डोरले,आकाश रोहिटे उपस्थित होते.

Pages