पोलीस पाटलांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवावा :- पोलिस पाटील संघटनेचे सचिव तानाजी यादव-पाटील... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, February 16, 2020

पोलीस पाटलांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवावा :- पोलिस पाटील संघटनेचे सचिव तानाजी यादव-पाटील...


         आमदार यशवंत माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी...

सोलापूर/प्रतिनिधी

         गृह व महसूल विभागातील ग्रामस्तरावरील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पोलीस पाटलांच्या विविध मागण्या विधानसभेत प्रश्न मांडून पोलिस पाटलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार यशवंत माने यांच्याकडे उत्तर सोलापूर पोलिस पाटील संघटनेचे सचिव तानाजी यादव यांनी निवेदनाद्वारे केली
         
  गावोगावी शांतता व  सुव्यवस्थेसाठी मदत करणारा महत्त्वाचा घटक म्हणून पोलिस पाटील काम करत असतात मागच्या सरकारने जवळपास 18000 पोलीस पाटील यांचे नव्याने नियुक्त करण्यात आले यामध्ये उच्चशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. मात्र अतिशय कमी मानधनात काम करावे लागत आहे. शासनाने एप्रिल 2019 पासून पोलिस पाटील यांचे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार पाचशे रुपये केले परंतु त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केलेली नाही.पोलिस पाटलांचे मानधन चार ते पाच महिने थकीत आहे. काही पोलिस पाटील यांचे कुटुंब फक्त मानधनावर उदरनिर्वाह करीत आहे मानधन वेळेत न झाल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक गणित कोलमडून गेले असून उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे.
           
       
पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करावी, पोलिस पाटलांचे मानधन वेळेवर व्हावे, नूतनीकरणाची प्रक्रिया बंद करण्यात यावी , पोलिस पाटलांना वेळोवेळी प्रशिक्षण करावे निवृत्तीच्या वयोमर्यादा मध्ये वाढ करण्यात यावी, तसेच नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस पाटलांना गृह व महसूल विभागामध्ये नोकरीमध्ये दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात. सरकारचे लक्ष वेधून या मागण्यांवर विचार करून पोलिस पाटलांचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी  निवेदनाद्वारे करण्यात आली.

Pages