प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवा :-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, February 1, 2020

प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवा :-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


  पंढरपूर/प्रतिनिधी
          चंद्रभागा नदीपात्र , प्रदक्षिणा मार्ग परिसरातील अतिक्रमणे तात्काळ  काढली जावीत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या माघवारी निमित्ताने आज संत तुकाराम भवन येथे आढावा बैठक झाली.  या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या. या बैठकीस नगराध्यक्ष साधना भोसले, मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे,  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शंकुतला नडगिरे उपस्थित होते.
           
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की,नदीपात्रातील आणि प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषद आणि शहर पोलीस यांनी संयुक्त आराखडा तयार करावा. या आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. याचबरोबर शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांची एकत्रित ठिकाणी व्यवस्था करावी. जेणेकरुन वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही.
           माघवारीत आरोग्याची यवस्था चोख केली जावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. संभाव्य अजारासाठी साथरोग यांची शक्यता लक्षात घेवून नियोजन करावे, असेही श्री शंभरकर यांनी सांगितले.
वारी कालावधीत वीजेचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. सर्व लाईन्स तपासून घ्याव्यात. वारीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम काढू नये, असेही शंभरकर यांनी सांगितले.
           वारी कालावधीत शहरातून वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलीस, परिवहन विभाग आणि राज्य परिवहन सेवा यांनी एकत्रित बसून नियोजन करावे. पंढरपूरात जड वाहतुकीला परवानगी देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
           
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी वारी कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात योग्य पाणी ठेवावे. त्यासाठी जलसंपदा विभाग आणि उपविभागीय अधिकारी यांनी नियोजन करावे, असे सांगितले जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठकीनंतर दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग,चंद्रभागा नदीवरील घाट आणि 65 एकर परिसरास भेट देवून पाहणी केली.Pages