बेळगाव/प्रतिनिधी
भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी कन्नडिगांना टोला लगावला. यावेळी सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही. याठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, केवळ थोडा भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे. कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
