आजचा औरंगजेब... नरेंद्र मोदी व्याख्याते हर्षल बागल लिहणार पुस्तक.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 13, 2020

आजचा औरंगजेब... नरेंद्र मोदी व्याख्याते हर्षल बागल लिहणार पुस्तक....



माढा/प्रतिनिधी
            काल भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर जय भगवान गोयल नावाच्या लेखकाने आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे पुस्तक प्रकाशित केले याचे फोटोज सोशलमिडियावर पडताच संतापाचा ऊद्रेक सर्वत्र पाहायला मिळाला . वि दा सावरकर यांच्या माफीनाम्यावर गोंधळ निर्माण करणारे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मात्र यावर मुग गिळुन गप्प आहेत . शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जर या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणुन लवकरात लवकर या प्रती जप्त करुन नष्ट केल्या नाहीत तर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंत्तीच्या मुहर्तावर आजचा औरंगजेब नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रकाशित करणार असा इशारा शिवव्याख्याते हर्षल बागल यांनी त्यांच्या सोशलमिडियातुन दिला आहे .
         
 या पुस्तकाच्या कव्हरचे फोटो सर्वत्र व्हायरल होताच अनेकांनी मोदींची तुलना हिटलर आसाराम तसेच ओसामाबिन लादेन यांच्याशी केली आहे . महाराष्ट्रातील अनेक मराठा नेते सध्या विधानसभा निवडणुकिच्या तोंडावर भाजपात गेले होते मराठा स्वाभिमान जपायचा की भाजपाची गुलामगिरी स्विकारायची हे त्याच्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह ऊभे राहिले आहे. भाजपाच्या आशिर्वादाने  राज्यसभेवर गेलेले युनराज छत्रपती संभाजीराजे यांनी या पुस्तकार बंदीची मागणी घातली आहे . पण छत्रपतींचे वंशज सरकार मध्ये असताना छत्रपतींची अवहेलना होतेच कशी असा सवाल नेटिजन्स आजच्या छत्रपतींच्या वंशजांना विचारत आहेत .
         २०१४ ला देखील देशातील निवडणुका झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा फोटो शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत हातात तलवार घेऊन दैनिक लोकसत्ता ने पहिल्या पानावर छापला होता . सातत्याने शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचले जात  आहे . यापुढे शिवरायांचा अपमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही जशास तसे ऊत्तर मिळेल शिवराय हे पुर्ण विश्वाचे प्रेरणास्थान आहेत असेही हर्षल बागल म्हणाले आहेत.

   भाजपा मधील मराठा नेते षंढ...
           भाजपाने आजपर्यंत अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केली,  अनेकवेळा निवडणुकिपुरते नाव वापरले,  अनेकवेळा शिवाजी महाराजांवर चुकीचे लिखाण करणाऱ्यांना मोठे पुरस्कार दिले . पण भाजपातल्या मराठ्यांनी तोंड ऊघडले नाही कदाचित भाजपात असलेले मराठे नेते हे षंड आहेत अशी बोचरी टिका व्याख्याते हर्षल बागल यांनी केली आहे

Pages