मतदासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, October 20, 2019

मतदासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना....              पंढरपूर/प्रतिनिधी

     पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा  सज्ज  झाली आाहे. मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झालेअसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  ढोले यांनी दिली.
            पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 33 हजार 579 मतदार  आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 73 हजार 909 पुरुष व 1 लाख 59 हजार 667 स्त्री मतदार तर इतर 3 मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात एकूण 328 मतदान केंद्रे असुन, या मतदाना प्रक्रीयेसाठी  केंद्रावर 1444 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक  नियुक्त अधिकारी व  कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात  आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी दिली.
         मतदासंघात मतदान यंत्रे व बॅलेट युनिट 656, ईव्हिएम कंट्रोल युनिट 328 व व्हिव्हिपॅट युनिट 328 असे बुथ निहाय मतदान साहित्यासह  मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात इाली आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोचवण्यासाठी परिवहन महामंडाळाच्या 48 बसेस तर 5 खाजगी वाहनांचा  वापर करण्यात आला असल्याची माहिती

Pages